संपर्क क्रमांक : ९५५२५८१४४५, ७३९१९७०४९१

Category: Uncategorized

श्रावणमास

श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना. व्रत वैकल्ये व सणांचा हा राजा. या मंगल दिवसांमध्ये मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ होत असते. दररोज सकाळी नित्य पूजा, दररोज सायंकाळी नित्य नियमाने ग्रंथ वाचन येथे पार पडते. विश्वमांगल्य सभेच्या संयोजनाने श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमहिम्न पठण व शिव आराधना केली जाते.
अधिक वाचा

महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंग अभिषेक व पूजा

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या निमित्ताने सकाळी नित्य पूजा त्यानंतर शिवलिंग अभिषेक व पूजा संपन्न होते. भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची दिवसभर मोठी वर्दळ राहते. 
अधिक वाचा

श्रीगणेश जयंती उत्सव

गणेश जन्म सोहळा येथे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होतो. मंदिराची आकर्षक सजावट यावेळी केली जाते. सकाळी नित्य पूजा, त्यानंतर भक्तांचे अभिषेक संपन्न होतात. यानंतर सुमारे तासभर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध कार्यक्रम व भक्तांच्या उपस्थितीमध्ये गणेशजन्म सोहळा संपन्न होतो. यावेळी सामूहिक अथर्वशीर्ष पठणही केले जाते.     
अधिक वाचा

श्रीदत्त जयंती उत्सव

दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात सुंदर सजावट केली जाते. नित्य पूजा, भक्तांचे अभिषेक, भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. भाविकांना सुंठवडा व प्रसादाचे वाटप केले जाते.
अधिक वाचा