संपर्क क्रमांक : ९५५२५८१४४५, ७३९१९७०४९१

कागल राम मंदिर

कागलमधील राम मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान. कागल बरोबरच कागलच्या बाहेरील राम भक्तांच्याही जिव्हाळ्याचे स्थान. या प्राचीन मंदिराची झालेली दुरवस्था पाहून स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचे मन व्यथित होत असे. स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांची तळमळ, दृढ निश्चय आणि मंदिर रचनेचा सखोल अभ्यास यांमधून हे देखणे व प्रसन्न मंदिर साकार झाले.
अधिक वाचा

रचना

वास्तुशास्त्र आणि स्थापत्य शास्त्राचा सखोल अभ्यास करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. स्थापत्य शास्त्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कसबी कारागिरांद्वारे या मंदिराची देखणी वास्तू उभी राहिली. मंदिराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने संगमरवर या शुभ्र व सुंदर दगडाचा वापर करण्यात आला. राजस्थान मधील 'मकराना' येथील संगमरवर हा सर्वात उत्तम प्रतीचा संगमरवर म्हणून ओळखला जातो. या मंदिराच्या निर्मितीसाठी याच 'मकराना' संगमरवराचा वापर करण्यात आला आहे.
अधिक वाचा
कार्यक्रम

कुंकुमार्चन कार्यक्रम

किमान ५०० महिलांसह कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन. 
अधिक वाचा

श्रीराम नवमी उत्सव

सात दिवस चालणार्‍या या सोहळ्यामध्ये दररोज सुश्राव्य भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच पालखी सोहळा व संध्याकाळी महाआरती होते.
अधिक वाचा

श्रीमहालक्ष्मी नवरात्र उत्सव

श्रीमहालक्ष्मी देवीचा नवरात्र उत्सव येथे मोठ्या उत्साहाने व पारंपारिक रीतीने साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये रोज वेगळ्या रूपात देवीची पूजा बांधली जाते. रोज संध्याकाळी महाआरती…
अधिक वाचा